असोसिएशनच्या आठवणी

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशन लि़. चा असोसिएशनच्या आठवणी

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशन लि़. ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व नागरी सहकारी बॅंका या सहकार क्षेत्रातील बॅंकांच्या कामकाजात समन्वय साधणारी संस्था आहे. .  

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशन लि़. चा इतिहास "

१. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनची म्युच्युअल ॲरेंजमेंट स्किम

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनची सन १९३९ साली बॉम्बे को- ऑप़ बॅंक असोसिएशन या नांवाने स्थापना झाली. पुढे सन १९६१ साली या असोसिएशन नामकरण महाराष्ट्र स्टेट को-ऑप़ बॅंक्स्‌ असोसिएशन असे करण्यात आले. या काळात महाराष्ट्रामध्ये बॉंम्बे प्रोन्सासियल को-ऑप़ बॅंक या नावाने मुंबई राज्यात शिखर बॅंक म्हणून काम करीत होती.त्याकाळी काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची व नागरी सहकारी बॅंकांची देखील स्थापना झाली होती. प्रत्येक बॅक आपआपल्या क्षेत्रात आपआपल्या पध्दतीने कार्य करीत होत्या व व्यवसायाच्या दृष्टीने बॉम्बे प्रोन्सासियल बॅंकेने सन १९३० साली म्युच्युअल ॲरेजमेंट स्किम सुरू केली. या योजनामुळे सभासद बॅंकांना एकमेकावर ड्राप्ट काढण्याची व बीले जमा करण्याची सोय उपलब्ध झाली. पुढे असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर एम़ ए़ स्किमचे काम असोसिएशनने आपल्या हाती घेतले. या योजनेत महाराष्ट्राबरोबर गुजरात ,कर्नाटक व गोवा या राज्यातील काही बॅंका देखील समाविष्ट झाल्या व ही योजना सहकारी बॅंकांसाठी अभुतपुर्व अशी योजना ठरल्या गेली. या योजनेमुळे राज्य सहकारी बॅंकेच्या चालु खात्यात मोठया प्रमाणावर रक्कमा जमा होउ लागल्या व सहकारातील पैसा सहकारामध्येच राहण्याचा व ठेवण्याचा हा अभुतपूर्व निर्णय झाला. महाराष्ट्रातील कानाकोप-यातील बॅंका या व्यवहारात सहभागी होउन त्यांचे नांव महाराष्ट्रातील कानाकोप-यात विश्वासपूर्व गेले. सन जुलै १९६९ मध्ये व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयकरण झाल्याने त्यांच्या शाखा खेडयापाडयात गेल्या व व्यापा-यांना एक दुसरा पर्याय उपलब्ध झाला. पर्यायाने या योजनेला थोडासा सेट बॅंक बसला. यावर विचार होउन या योजनेत काही फेरबदल देखील करण्यात आले. ’’ नो ॲडव्हाईस ’’ सारखी योजना देखील राबविण्यात आली. सन १९९२ - ९३ मध्ये मुक्त अर्थव्यवस्था भारतात लागू झाली व खाजगी बॅंकांचे जाळे भारतात पसरू लागले. या बॅंकानी नागरी सहकारी बॅंकांशी संपर्क साधून डिमांड ड्राप्ट व विना विलंब पैसे पाठविण्याची सोय विनामुल्य उपलब्ध करन दिली व ब-याचशा बॅंकांनी खाजगी बॅंकेमध्ये आपले खाते उघडून हा व्यवहार खाजगी बॅकांमार्फत करण्यास सुरवात केली. पर्यायाने सहकारातील पैसा हा खाजगी बॅंकांमध्ये वळविण्यात आला. खाजगी बॅंकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यामुळे हा व्यवहार अतिशय जलद गतीने होउ लागला. दुदैवाने राज्य बॅंकेने यांचे गांभीर्य न ओळखल्यामुळे एम़ ए़ स्किम मधील ब-याचशा बॅंका हया एम़ ए़ स्किम मधून बाहेर पडू लागल्या व आता तर आरटीजीएस , एनएफटी सारख्या आधुनिक सोयी उपलब्ध झाल्यामुळे असोसिएशनची ही ऐतीहासिक योजना बंद पडलेली आहे.

"२. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनला स्टेट लेवल रिव्हीव कमीटीमध्ये मिळालेले सदस्यत्व -"

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ फेडरेशनची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनचे केवळ एम़ ए़ स्किम राबविण्यापुरतेच अस्तित्व आहे असा अघोषित निर्णय नागरी सहकारी बॅंकांमध्ये पसरवण्यात आला व याला वरिष्ठ पातळीवर कुणीही फारसे गांभीर्याने घेतले नाही. रिझर्व्ह बॅंकेने नागरी सहकारी बॅंकांसाठी राज्यस्तरीय रिव्हीव कमीटीची स्थापना केली होती व संयोजक महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक काम करित होती. त्यामध्ये रिझर्व्ह बॅंकेचे , शासनाचे व फेडरेशनेचे सदस्य होते. रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकाप्रमाणे फेडरेशन व असोसिएशन हया दोघाचे प्रतिनिधीत्व या समितीमध्ये असणे आवश्यक होते. परतु असोसिएशनला प्रतिनिधीत्व दिले गेले नव्हते. ही बाब रिझर्व्ह बॅंकेच्या व राज्य बॅंकेच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर असोसिएशनला हया समितीमध्ये कायम स्वरूपी सदस्यत्व देण्यात आले. त्याचा फायदा निश्चीतच नागरी सहकारी बॅंकांना झाला व असोसिएशनची भूमिका एम़ ए़ स्किम वरून बदलून इतर कार्याला जोडण्यात आली. अशाच प्रकारची रिझर्व्ह बॅंकेने सन २००५ मध्ये टास्क फोर्सची स्थापना केली. या टास्क फोर्समध्ये सभासदत्व मिळण्यासाठी सहकारातीलच एका संस्थेने विरोध केला व रिझर्व्ह बॅकेने असोसिएशनला सभासदत्व नाकारण्यात आले़ वास्तविक व्हीजन डॉक्युमेंट २००५ महाराष्ट्रात लागू करण्याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशनने महत्वपूर्ण असे योगदान दिले आहे. परंतु सहकारातील चुकीच्या स्पर्धेचा फटका असोसिएशनला बसला ही दुदैवाची बाब आहे.

३. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनचा प्रशिक्षण कार्यक्रम -

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनला कै़ विष्णू अण्णा पाटील यांचे लाभल्यानंतर दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनच्या कार्याची व्याप्ती वाढण्यास सुरवात झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कार्यकारी संचालकपदी श्री़ डी़ एल़ क्रियाडो यांची नेमणूक झाली व त्यांची दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनच्या मानद सचिव पदी निवड झाली. कै़ विष्णू अण्णा पाटील व श्री़ डी़ एल़ क्रियाडो यांनी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशच्या अधिका-यांवर व पदाधिका-यांवर विश्वास टाकून त्यांना आपले काम स्वतंत्रपणे करण्यास मुभा दिली व ब-याच अंशी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनची राज्य सहकारी बॅंकेच्या बंधनातून मुक्तता झाली. श्री़ डी़ एल़ क्रियाडो यांना मुळातच रिझर्व्ह बॅंकेतील प्रशिक्षण देण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांनी असोसिएशवर सहकारी बॅंकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी टाकली व दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनने आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरवात केली. विभागवार किंवा बॅंकांमध्ये प्रत्यक्ष जाउन सहकारी बॅंकांच्या कर्मचा-यांना असोसिएशनने प्रशिक्षण देणे सुरू केले. याचा फायदा सहकारी बॅंकांना चांगल्या प्रकारे झाला. असोसिएशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमास शासनाने मान्यता दिली. सहकारी बॅंकांमधील कर्मचा-यांना आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेउन असोसिएशनने या प्रशिक्षणा बरोबरच श्रीमती स्वाती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनमान्य असा आय़ टी़ कोर्स सुरू केला होता. याचा सुध्दा सहकारी बॅंकांच्या कर्मचा-यांना चांगला फायदा झाला.

४. सत्कार कार्यकर्त्यांचा व बॅंकांचा : -

महाराष्ट्र राज्यात सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्याची मोठी पंरपंरा आहे. परंतु या कार्यकत्यांच्या कार्याची नोंद कुठेही घेतल्या जात नव्हती. ही बाब महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनच्या निर्दशनास आल्यानंतर असोसिएशनने अशा कार्यकर्त्याचा सन्मान करण्याचे ठरविले व त्यातूनच ’’ जीवन गौरव पुरस्कार ’’ या पुरस्काराची निमिर्ती झाली व याला सर्वसमंत्त्तीने कै़ विष्णू अण्णा पाटील यांचे नाव देण्यात आले. त्याचप्रमाणे महिला कार्यकर्त्याला श्रीमती सुशिलादेवी देशमुख महिला पुरस्कार , कै़ बाबासाहेब घुईखेडकर तरूण सहकारी कार्यकर्ता पुरस्कार , कै़ बापूरावजी देशमुख कर्मचारी पुरस्कार या नांवाने पुरस्कार देण्याची योजना सुरवात झाली. त्याचप्रमाणे कै़ वैकुंठभाई मेहता जिल्हा बॅंक पुरस्कार , कै़ वसंतदादा पाटील नागरी सहकारी बॅंक पुरस्कार, जिजामाता महिला बॅंक पुरस्कार या नांवाने संस्थाना पुरस्कार देण्याची योजना गेल्या २५ वर्षापासून अव्हयाहतपणे सुरू आहे. हे पुरस्कार ज्याच्या नांवे दिलेला आहे त्या व्यक्ती देखील अजरामर झाल्या आहेत.

५. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनच्या संचालकाचा अभ्यासदौरा -

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनला कै़ विष्णू अण्णा पाटील यांचे नेतृत्व लाभल्यानंतर असोसिएशनच्या संचालकामध्ये एक उत्साह संचारला. असोसिएशनच्या ज्या सभा दहा किंवा पंधरा मिनीटात संपत होत्या. त्या सभा आता एक - एक तास चालीत होत्या. संचालक एकमेकाच्या जवळ येउ लागले. यातून संचालकाच्या अभ्यास दौ-याची कल्पना पुढे आली. मात्र अभ्यासदौ-याचा संपूर्ण खर्च असोसिएशनवर न टाकता त्या खर्चाचा काही भाग संचालकांनी उचलला. असोसिएशनचा पहीला अभ्यासदौरा गुजरातमध्ये झाला. त्यानंतर राजस्थान , कर्नाटक , केरळ , सिंगापूर , मलेशिया , थायलंड , श्रीलंका , हॉककॉग या ठिकाणी अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले. या अभ्यासदौ-यामुळे त्या त्या भागातील बॅंकांनां भेटी देता आल्या व दुसरी महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातून आलेले संचालक हे एकमेकाच्या जवळ आले , विचाराची देवाणघेवाण झाली व सहकारातील नवीन नेतृत्वाच्या फळीची निर्मिर्ती झाली. अर्थात याचे श्रेय कै़ विष्णूअण्णा पाटील यांच्या संघटन कौशल्याला द्यावे लागेल. हया अभ्यासदौ-या बरोबर दरवर्षी असोसिएशनच्या संचालकांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो.

६. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनचे स्वतःच्या मालकीच्या जागेत स्थलांतर -

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनचे कार्यालय हे राज्य बॅंकेच्या वेगवेगळया जागेत एखाद्या खोलीमध्ये होते. स्वतःची हक्काची जागा नसल्यामुळे राज्य बॅंक म्हणेल तिथे असोसिएशन आपले बि-हाड हलवित होते. त्यामुळे असोसिएशनला स्थैर्य असे काहीच नव्हते. एवढेच नाही तर राज्य सहकारी बॅंकेने दिलेले फर्निचर असोसिएशनच्या कार्यालयात वापरले जात होते. इथे असोसिएशनच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत होता. असोसिएशनच्या सभा देखील राज्य बॅंकेच्या सभागृहात पार पडत होत्या. त्यामुळे आपण कोणावर तरी अवलंबून आहे अशी भावना असोसिएशनच्या संचालकामध्ये व कर्मचा-यांमध्ये होती. एक वेळ अशी आली सन २००३-२००४ मध्ये राज्य बॅंकेकडून गिरगांवधील जागा खाली करण्याबाबत सुचना प्राप्त झाली व असोसिएशनने आपला संसार गुंडाळून परत राज्य बॅंकेच्या वाशी येथील कार्यालयात नेला. या स्थलातरांचा गांर्भीयाने विचार संचालक मंडळाने केला व मुंबईमध्ये आपल्या हक्काची जागा शोधण्यास असोसिएशनने सुरवात केली. त्यावेळी असोसिएशनचे मा़ संचालक श्री़ माणीकराव पाटील , श्री़ यशवंतराव पाटील , श्री़ अण्णासाहेब जवंजाळ , ॲड़ मुंकुंद आवटे , श्री़ संजय भेंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ तराळे यांनी वरळी ते दादर विभाग पिंजून काढला व वडाळा येथे आपल्या जागेची निवड केली. ही निवड कै़ शिवरामभाऊ जाधव यांना भेटून सांगीतल्यानंतर एका साध्या को-या कागदावर त्यांनी मंजूरी देऊन असोसिएशनच्या संचालक मंडळावर पूर्ण विश्वास टाकला आणि नवीन जागेचे काम सुरू झाल्यानंतर दिनांक ६ सप्टेबर २००५ रोजी असोसिएशन आपल्या हक्काच्या जागेत कायम स्वरूपी स्थलांतरीत झाली. जागा घेण्यासाठी कुणाचीही मदत न घेता स्वतःच्या फंडातून ती विकत घेतली ही एक जमेची बाजु आहे.

७. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकमंडळात असोसिएशनच्या संचालकांना मिळालेले प्रतिनिधीत्व.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकमंडळामध्ये असोसिएशनच्या जिल्हा बॅंक मंडळातील काही संचालक होते. परंतु नागरी सहकारी बॅंकांमधुन निवड होताना असोसिएशनच्या संचालकांना कधीही प्रतिनिधीत्व मिळाले नव्हते. वास्तविक महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचाच एक भाग म्हणून असोसिएशन काम करित होती , परंतु असोसिएशनच्या संचालकांना कधीही प्रतिनिधीत्व मिळाले नव्हते. परंतु कै़ विष्णू अण्णा पाटील यांनी पहिल्यांदा असोसिएशनच्या संचालक मंडळातील मा़ श्री़ मधुकरराव जवंजाळ यांना प्रतिनिधीत्व दिले. त्यानंतर मा. श्री़ माणिकराव पाटील , श्री़ यशवंतराव पाटील या संचालकांना राज्य बॅंकेत प्रतिनिधीत्व मिळाले. येवढेच नाहीतर मा़ श्री़ माणिकराव पाटील यांना राज्य बॅंकेच्या अध्यक्षपदाचा देखील मान मिळाला.

८. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनच्या कार्याचा विस्तार

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशनला आपली हक्काची जागा मिळाल्यानंतर असोसिएशनने आपले कार्यक्षेत्र विस्तारण्यास सुरवात केली व सन २००५ पासून असोसिएशनने वेगवेगळया योजना राबविण्यास सुरवात केली. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे कोर्सेस , इन्स्टिटयुट ऑफ बॅंकिंग ॲण्ड फायनान्स यांचे कोर्सेस, सहकारी बॅंकांना आधुनिक तंत्रज्ञानचे मार्गदर्शन करण्यासाठी आय़ टी़ कन्सल्टटसी , इन्फरमेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम ऑडीट , आय़ टी़ पॉलीसी , आय़ टी़ अेनेबल एच आऱ पॉलीसी इत्यादी कामे , सहकारी बॅंकांच्या कर्मचा-यांची भरती व बढती कार्यक्रम राबविणे. सहकारी बॅंकांमध्ये संशोधन व्हावे म्हणून रिसर्च ॲड प्लॅनिंग डिर्पार्टमेंन्ट ची निर्मिर्ती, यादृारे पी़ एच़ डी़ सारख्या विषयावर मार्गदर्शन , बॅंकांसाठी पॅनकार्ड योजना , आय़ एस़ ओ़ सर्टिफिकेशन अशा विविध योजनांची सुरवात असोसिएशनने केली. अश्या प्रकारच्या विविध योजना राबविणारी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशन ही भारतातील पहिली संस्था आहे यांचा आम्हांला अभिमान आहे. हया योजना पार पाडीत असताना असोसिएशनचे मा़ संचालक मंडळाबरोबरच सहकारावर प्रेम करण्या-या बाहेरच्या व्यक्ती देखील आहेत. त्यांची प्रामुख्याने नावे घ्यावयाचीं झाल्यास श्रीमती स्वाती पांडे , श्री़ डी़ एल़ क्रियाडो , डॉ़ कावेरी , डॉ़ भास्करन , श्री़ टी़ एस़ चव्हाण यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. या सर्वाच्या बरोबर असोसिएशनचे पदाधिकारी व कर्मचारी यांची मदत असोसिएशनला नेहमीच होत आहे.

Our Jouney

Established

1939

100 Banks

1960

Expand North Maharashtra

1980

1st Banking Awards

1994-95

Together, we can set new standards for excellence, integrity, and prosperity, not only for our members but for the entire community.

Join us in shaping the future of co-operative banking with MSCBA.

सदस्य व्हा