ABOUT BANK
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड. ही मुंबई जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त सहकारी संस्थांची केंद्रीय वित्तीय संस्था आहे, ही बँक “मुंबई बँक” या नावाने ओळखली जाते. १९७४ साली एमसीएस अधिनियमांतर्गत या बँकेचे नोंदणीकरण करण्यात आले आणि १२ फेब्रुवारी १९७५ पासून या बँकेचे कार्य सुरु झाले. या जिल्ह्यात कृषी उत्पादन नसल्यामुळे मुंबई बँक बिगर-कृषी सहकारी संस्थां जसे की, शहरी सहकारी बँका, शहरी सहकारी क्रेडिट सोसायटीज, कर्मचारी सहकारी क्रेडिट सहकारी सोसायटीज, सहकारी ग्राहक स्टोअर, औद्योगिक, मत्स्य आणि कामगार सहकारी सोसायटीज इत्यादींच्या अर्थविषयक गरजा पुरविते. भारतामध्ये सहकारी चळवळींद्वारे जी धोरणे सुरु करण्यात आली आहेत त्यांचा उद्द्येश्य आहे की, देशाची प्रगती, गरीबांचा विकास आणि देशातील सामाजिक-सांस्कृतिक विचारांच्या तत्वांचा प्रसार करणे. सहकार चळवळीने आपल्या देशाला आर्थिक विकास करण्यास आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सक्षम केले. सहकारी तत्वाचे यश अधिकतर त्यांच्या समोर येणाऱ्या समस्यांना जलदगतीने बदलणाऱ्या उदारमतवादी आर्थिक युगात प्रगती आणि विकासाच्या सुवर्णसंधीमध्ये रूपांतर करण्यावर अवलंबून असते. भारतीय सहकारी चळवळ आजतागायत जगातील सर्वात मोठी चळवळ आहे. भारतीय सहकारी संस्था जवळजवळ सर्व महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, जसे की शेती, कृषी प्रक्रिया, खते, विपणन, क्रेडिट, डेअरी, कापणी, हातमाग आणि हस्तशिल्प, साखर, मत्स्य, बँकिंग इत्यादी. भारतात सहकारी संस्थांनी खूप प्रसिद्धी मिळविली कारण या संस्थांनी खोलवर रुजण्याची आणि संस्थांवर सशक्त विश्वास ठेवण्याची क्षमता सिद्ध केली आहे. काही सहकारी संस्थांचे कार्य करण्याचे क्षेत्र गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा संपूर्ण भारतभर मर्यादित आहे. सहकारी संस्थांमध्ये संगणीकरणाची नवीन गरज निर्माण झाली आहे. यशस्वी व्यावसायिक संस्था निर्माण करण्यासाठी कार्यकारी क्षमता, ग्राहक सेवा, पत्रव्यवहार आणि व्यवस्थापकीय माहिती पद्धती हे चार महत्वाचे घटक आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडद्वारे हे घटक संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात सुधारण्यात आले. सहकारी संस्था स्वयंसेवी, स्व-जबाबदारी, लोकशाही, समानता, न्यायसमता आणि एकता या मूल्यांवर आधारित आहे. सहकारी तत्वे ही सहकारी संस्थांची मूल्ये अभ्यासण्याची मार्गदर्शक तत्वे आहेत. सप्टेंबर १९९५ मँचेस्टरमध्ये आयोजित केलेल्या इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स (आयसीए- आंतरराष्ट्रीय सहकारी गठबंधन) संमेलनात सहकाराची सात मूळ तत्वे मंजूर करुन स्वीकारण्यात आली.