ABOUT BANK
गिरणी कामगार आणि अन्य औद्योगिक कामगार व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तसेच उपेक्षित वर्गांची सेवा करण्याच्या हेतुने प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या एका समर्पित गटाने रु. 5,000 भांडवलावर सन 1964 साली अभ्युदय सहकारी पतपेढी स्थापन केली. त्या वेळी काळाचौकी, शीवडी, परळ आणि अन्य शेजारी भागांमध्ये बहुतांशी औद्योगिक कामगार आणि कनिष्ठ मध्यम उत्पन्न गटातील लोकांची लोकसंख्या खूप होती. अल्पावधीतच अभ्युदय सहकारी पतसंस्थेचे रूपांतर एका नागरी सहकारी बँकेमध्ये झाले. अखेर, जून, 1965 मध्ये ''सहकारातून समृद्धी'' हे ब्रीद घेऊन अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड ची स्थापना झाली.