ABOUT BANK
प. पु. डॉ रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर ( पी. एच.डी ) ह्यांच्या कृपाप्रसादाने व प.पु . विष्णू महाराज पारनेरकर ह्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या पवित्र उपस्थितीत दिनांक २ फेब्रुवारी १९८५ ला ” समाजोन्नती व राष्ट्रोन्नती ” हे प्रमुख ध्येय डोळ्यासमोर ठेवून बँकेचा उदघाटन सोहळा संपन्न झाला .प्रारंभाच्या संघर्ष काळानंतर बँकेने ख-या अर्थाने प्रगतीकडे झेप घेतली ती १९९२ नंतर आणि बँकेला समाजाभिमुख बनविण्याचे सारे श्रेय जाते ते त्यावेळचे अध्यक्ष डॉ . अरुण गो . निरंतर व त्यांच्या सर्व सहकारी संचालक मंडळाला. त्यात प्रामुख्याने साथ लाभली ती विद्यमान अध्यक्ष डॉ. शरद वैद्य ,डॉ. जयंत लऊळकर ,अँड.ओमप्रकाश कलंत्री ह्यांची .गेल्या ३१ वर्षाच्या कालखंडात बँकेने समाजमनावर आपली एक वैशिष्ठ्यपूर्ण अशी छबी निर्माण केली असून .पूर्ण महाराष्ट्रात शाखा उघडून व्यवसाय वाढ केली आहे . सध्या बँकेच्या प्रामुख्याने २५ शाखा असून त्याद्वारे अविरत व अखंड अशी सेवा चालू आहे . आज बँकेत एकूण २४२ कर्मचारी ,संपूर्ण महराष्ट्र कार्यक्षेत्र ,२०२२८ भागधारक ,२४१५.५९ लक्ष भाग भांडवल ,६६११७.३६ लाख ठेवी ,४१८४०.६२ लाख कर्ज व नेट एन.पी.ए ७.३८%आहे .बँकेस ३१०.७४ लाख रुपयांचा नफा असून सी.आर.ए.आर १२.०७% आहे. बँकेची स्वत:ची ९९०६ स्के.चौ.मी जागा असून बँकेची मुख्य शाखा व मुख्य कार्यालय स्वत:च्या भव्य वास्तू मध्ये आहे .सध्या बँके मध्ये कोर बँकिंग प्रणाली सुरु केली असून डेटा सेंटर चे काम झाले